गुहागर नगरपंचायत निवडणुकीतून 11 जणांची माघार

नगराध्यक्षपदातून सेनेचा उमेदवारी अर्ज मागे
नगरसेवकपदासाठी 10 उमेदवारी अर्ज मागे

गुहागर | प्रतिनिधी :
गुहागर नगरपंचायत निवडणूकिची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे.अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शुक्रवारी नगराध्यक्षपदासाठी एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून नगरसेवक पदासाठी 10 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे येथील निवडणूकितुन एकूण 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी दिली.

शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेनेकडून मयुरी मयूर मुकनाक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे आता भाजप सेना युतीकडून नीता विकास मालप,महाविकास आघाडीकडून पारीजात पराग कांबळे,राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुजाता श्रीधर बागकर व अपक्ष म्हणून सुप्रिया वाघधरे अशी लढत होणार आहे.तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून योगिनी शैलेश शिरधनकर (अपक्ष),प्रभाग क्रमांक 2 मधून सेनेकडून राकेश कमलाकर साखरकर, प्रभाग क्रमांक 5 मधून सिद्धी राजेश शेटे (अपक्ष), प्रभाग क्रमांक 7 भाजपकडून विशाखा विकास जाधव, प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपकडून नरेश रामदास पवार, प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपकडून मंगेश लक्ष्मण जोशी, प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादीकडून साहिल प्रदीप आरेकर व अपक्ष उमेदवार सौरभ राजेंद्र भागडे, प्रभाग क्रमांक 14 मधून अपक्ष उमेदवार रविंद्र सीताराम ठोंबरे व प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपकडून प्रज्ञा प्रभाकर जांगळी असे एकूण 10 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी भरलेले आपले अर्ज मागे घेतले आहेत.