घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य विभागात सॉफ्टवेअर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

चिपळूण (प्रतिनिधी) :-घरडा फाऊंडेशनच्या घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी मधील स्थापत्य विभागातर्फे “स्ट्रकचरल डिझाइनिंग युसिंग इ-टॅब अॅड आर. सी.डी.सी. सॉफ्टवेअर” या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले.

दिनांक २६ जून ते ६ जुलै २०२३ या कालावधी मध्ये आयोजित केलेल्या प्रशिक्षणात स्थापत्य इंजिनिअरिंग विभागातील विदयाथ्र्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. स्थापत्य शाखेमध्ये बदलत्या काळानुसार सॉफ्टवेअरची गरज यांची माहिती दिली. प्रशिक्षक श्री. दिवांशु यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी सॉफ्टवेअर बद्दलची कार्यपद्धती आणि त्याची उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेत इ-टॅब आणि आर.सी.डी.सी. सॉफ्टवेअर वापरुन विदयार्थ्यांनी विविध प्रकल्पावरती स्वतः काम केले.

 

इ-टॅब अँड आर. सी. डी. सी. सॉफ्टवेअर प्रशिक्षण कार्यशाळेची सांगता प्रशस्तीपत्रक वितरण कार्यक्रमाने झाली. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील आणि विभाग प्रमुख डॉ. ए. डी. भोसले व सर्व प्राध्यापक यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी विभाग प्रमुख, प्रा. जाधव, प्रा. माळी व हेमंत पवार यांनी विशेष प्रयत्न केले.