माखजन:
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल मध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.
माजी विद्यार्थ्यांच्या सभेमध्ये बुरंबाड येथील माजी विद्यार्थी सचिन विष्णू साठे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली.तर बुरंबाड येथील स्वप्नील बापट यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
या माजी विद्यार्थी संघाचे सचिव पद हे मुख्याध्यापक महादेव परब यांचे कडे असणार आहे.तर समिती मध्ये खजिनदार म्हणून दत्ताराम उर्फ भाई मोरे (मावळंगे),तर सदस्य म्हणून गौरव पोंक्षे (आंबव पोंक्षे) ,सचिन तांदळे(माखजन),हरेश कातकर (बुरंबाड) ,ज्ञानदेव पड्यार(बुरंबाड) गणेश सहस्त्रबुद्धे (चिपळूण)यांची निवड झाली आहे.
शाळेच्या प्रगती साठी आणि नाव लौकिक वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे नूतन अध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले. माजी विद्यार्थी सभेमध्ये ओंकार नामजोशी यांनी. सूत्रसंचालन केले.तर मुख्याध्यापक महादेव परब यांनी प्रास्ताविक व आभार मानले.












