सावंतवाडी राजवाडा सभागृहात उद्या ‘नाट्यरंग’ कार्यक्रम

सदगुरू संगीत विद्यालयाचे आयोजन

सावंतवाडी : प्रतिनिधी 

सदगुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी आणि सदगुरू संगीत विद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘नाट्यरंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सदगुरू संगीत विद्यालयाचे विद्यार्थी निवडक नाट्यपदांचे साभिनय सवेष गायन सादरीकरण करणार आहेत. सदर कार्यक्रम सावंतवाडी राजवाडा सभागृहात होणार आहे.

 

यावेळी नाट्यदिग्दर्शक व अभिनेते गणेश ठाकूर, ज्येष्ठ दिग्दर्शक वसंत उर्फ भाऊ साळगावकर, संगीत अलंकार दीप्तेश मेस्त्री, ॲड. नम्रता नेवगी उपस्थित राहणार आहेत. सदर कलाकारांना ऑर्गन साथसंगत निलेश मेस्त्री व मंगेश मेस्त्री, हार्मोनियम मनीष पवार, पुरुषोत्तम केळुसकर, साक्षी गावकर व तन्वी मेस्त्री, तबला किशोर सावंत, सिद्धेश सावंत, नीरज भोसले करतील.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कात्रे व आशा मुळीक करणार आहेत. ध्वनी संयोजन हेमंत मेस्त्री यांचे आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सदगुरु संगीत विद्यालयाचे संचालक निलेश मेस्त्री यांनी केले आहे.