गुहागरमध्ये मतदारांचा सर्वाधिक उत्साह, ४६.४७% मतदान नोंद
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा मतदानाचा अहवाल जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. या अहवालानुसार, सकाळच्या सत्रात ११:३० वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ३०.८९ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण १,६०,४४८ मतदारांपैकी ४१,७७६ मतदारांनी ११:३० वाजेपर्यंत मतदान केले आहे. यामध्ये २२,१३४ पुरुष, १९,६४१ स्त्री आणि १ इतर मतदाराचा समावेश आहे.
मतदारांमध्ये सर्वाधिक उत्साह गुहागर नगरपंचायत येथे दिसून आला आहे, जिथे तब्बल ४६.४७ टक्के (२,७७०) मतदान झाले आहे. त्या खालोखाल देवरुख नगरपंचायत (३२.८६%), संगमेश्वर नगरपंचायत (३२.६%), आणि राजापूर नगरपरिषद (३०.२८%) येथे मतदारांचा चांगला सहभाग नोंदवला गेला.
त्याशिवाय खेड नगरपरिषद: २८.१%, चिपळूण नगरपरिषद: २४.०२% , रत्नागिरी नगरपरिषद: २१.९३% असे मतदान झाले.
सकाळच्या पहिल्या दोन तासांत (७.३० ते ९.३०) जिल्ह्यात केवळ १४.२६% मतदान झाले होते, मात्र त्यानंतर मतदारांनी बाहेर पडून मतदानाचा वेग वाढवल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
> एकूण मतदार: १,६०,४४८
> झालेले एकूण मतदान (११.३० पर्यंत): ४१,७७६
> एकूण टक्केवारी: ३०.८९%












