एकावेळी सात विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनलेली पहिलीच शाळा..
वेंगुर्ले : प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वजराट नंबर १ शाळेने गुणवत्तेत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. ग्रामीण भागातील या शाळेत यावर्षी तब्बल ७ विद्यार्थी राष्ट्रीय आणि राज्य गुणवत्ता यादीत चमकून शिष्यवृत्ती धारक बनले आहेत. त्यामुळे ग्रामीण गुणवत्तेचा वजराट पॅटर्न याची सध्या तालुक्यासह जिल्ह्यामध्ये चर्चा आहे.शाळा वजराट नंबर १ मधील या सात विद्यार्थ्यांमध्ये कु.कर्तव्य तेजस बांदीवडेकर (राष्टीय ग्रामीण जिल्ह्यात तिसरा), वेदिका जयंत वजराटकर (राज्यस्तरीय ग्रामीण जिल्ह्यात दुसरी), कार्तिक प्रकाश पडवेकर ( राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक), पूर्वा नरेश परब ( राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तिधारक), अश्विन अर्जुन सोनसुरकर (राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक), हर्षल संतोष मेस्त्री (राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक) आणि स्नेहा पांडुरंग परब (राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृतीधारक) यांचा समावेश आहे. तसेच कु. यश सचिन गावडे, कु .मयूर जगन्नाथ कांदे , कु.वेदांत विकास पालयेकर, कु .आर्यन सोमनाथ सावंत हे विद्यार्थि उत्तीर्ण झाले तर कु.आयुष् राणे, कु.सावी सावंत, कु.मयंक मुळीक ,कु.स्वप्नील मेस्त्री यांनी समाधानकारक गुण मिळवले आहेत.
सर्व मुलांचे आणि पालकांचे गावाकडून अभिनंदन होत आहे. या मुलांना शाळेतील श्री कृष्णा खरात, श्रीम वसुंधरा सुर्वे, मुख्याध्यापक श्री संजय परब, वर्गशिक्षक श्री तेजस बांदिवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या मुलांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री राजन परब, श्री प्रेमानंद भोसले, श्री शेखर परब, श्रीम अस्मिता वजराटकर, शिक्षिका श्रीम रुपाली पाटील, श्री दशरथ वजराटकर, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य, माता पालक संघ सदस्य यांनी अभिनंदन केले. तसेच आमच्या गावच्या सरपंच श्रीम अनन्या पुराणिक , उपसरपंच श्रीम केरकर मॅडम , सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व शिक्षण प्रेमी नागरिक, पालक आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.












