मसुरे | प्रतिनिधी बिळवस वरचावाडा येथील श्रीमती इंदुमती दिगंबर पालव (83 वर्ष ) यांचे अल्प आजाराने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिवसेना मसुरे जि. प. विभाग प्रमुख संतोष पालव आणि हरिश्चंद्र पालव यांच्या मातोश्री होत. बिळवस स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.













