जिल्हा कबड्डी पंच परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलचे श्री आनंदा लक्ष्मण बामणीकर जिल्ह्यात द्वितीय

दोडामार्ग l प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनशी संलग्नित सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन मार्फत घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे सहायक शिक्षक , राज्य शासन पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री आनंदा लक्ष्मण बामणीकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. लेखी व प्रात्यक्षिक स्वरूपाच्या या पंच परीक्षेत त्यांनी आपले कौशल्य यातून दाखवून दिले. या पंच परीक्षेत एकूण 41 विद्यार्थी जिल्ह्यातून प्रविष्ट झाले होते. त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ दिनेश नागवेकर, सचिव व्ही बी नाईक, खजिनदार श्री सी एल नाईक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक यांचेकडून अभिनंदन करण्यात आले.