बांदिवडे पालयेवाडी स्मशानभूमिचे लोकवर्गणीतून नूतनिकरण मसुरे | झुंजार पेडणेकर बांदिवडे पालयेवाडी येथे सुमारे दीड लाख रुपये लोकवर्गणी मधून स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात आल्याची माहिती सत्यवान सावंत यांनी दिली. स्मशान शेडचे पत्रे खराब झाले होते. ग्रामस्थ आणि मुंबई कर चाकरमानी यांच्या आर्थिक सहकार्यातून स्मशान भूमिचे नूतनिकरण तसेच लाकडे ठेवण्यासाठी जागा आणि सोलर लाईट बसविण्यात आले आहे. बांदिवडे ग्रामपंचायतने सुद्धा या ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे. मदत केलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत.













