ओंकार हत्ती कळणेत दाखल; हत्ती पाहण्यासाठी गर्दी!

दोडामार्ग :सुहास देसाई

सावंतवाडी तालुक्यातील काही भागातील गावात ओंकार हत्ती धुमाकूळ घालत असताना लोकवस्ती सर्वांना आकर्षण ठरत होता त्यांचे आज कळणे परिसरात या हत्तीचे आगमन झाले आहे. ‘ओंकार’ नावाचा हा हत्ती सध्या कळणे आणि आसपासच्या गावात मुक्काम करून आहे. या हत्तीला पाहण्यासाठी कळणे आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे.

​हत्ती ‘ओंकार’ हा शांत स्वभावाचा असून त्याने अद्याप कोणत्याही मालमत्तेचे नुकसान केले नाही. मात्र, हत्ती कळण्यात दाखल झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्याला पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येत आहेत. वन विभागाने हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवले असून, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांना हत्तीपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.

​हा हत्ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
​वन विभागाचे आवाहन: नागरिकांनी हत्तीपासून सुरक्षित अंतर राखावे आणि गर्दी करू नये. ​या हत्तीचे शांतपणे दर्शन घ्यावे आणि त्याला त्रास होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.