विधानभवनातून
संतोष वायंगणकर
नागपूरच हिवाळी अधिवेशन तस गेली अनेक वर्षे राजकिय घडामोडी साठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील अनेक राजकीय घडामोडी याच नागपूरच्या या उपराजधानीतच होत आल्या आहेत. यावेळीही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही आमदार फूटतील अस शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी विधानभवना बाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले आणि गेले तीन दिवस विधानभवन परिसरात कोणा कोणाचे कोण आमदार फूटू शकतात याची चर्चा सुरू झाली. उबाठाकडूनही शिंदे शिवसेनेत आमदार फूटतील याची चर्चा घडवली त्यावर मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे शिवसेनेचे आमदार तर आमचेच आहेत. अस सांगून यात पुन्हा आणखीन चर्चा घडू लागली आमदार फुटणार काय याची नागपूरात चर्चा जोरदार सुरू आहे. आमदार नागपूरच्या अधिवेशनातच फुटतात हा आजवरचा राजकीय इतिहास आहे. आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात महाराष्ट्रातील बिबट्यांच्या मानवी वस्तीतील हल्ल्याचा विषय आज पुन्हा एकदा चर्चेत आला तो शिवसेना आमदार शरद सोनावणे यांनी पुन्हा एकदा विषय चर्चेत आणला. महाराष्ट्रातील बिबट्यांचे हल्ले फारच वाढले आहेत. यामुळे बिबट्यांच्या हल्याचा विषय महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील गंभिर प्रश्न झाला आहे. विधीमंडळातील दोन्ही सभागृहात सदस्यांनी आपापल्या भागातील प्रश्न मांडले. विधीमंडळात दुपार नंतरच सभागृहात अनेक विषयाची चर्चा करण्यात आली. महसूल अधिनियमात करण्यात आलेल्या बदलाने नवीन कायदे करुन जे बदल करण्यात येत आहेत. त्याविषयीची चर्चा विधानसभेत करण्यात आली. आज काही सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आली. विधीमंडळातील कामकाज आज कोणतीही गरमागरमी न होता कामकाज पार पडले. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचा विषयाची चर्चा झाली. राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील यांनी चर्चेत सहभागी घेतला. पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. आज नागपूरात विविध मागण्यांसाठी १३ मोर्चा काढण्यात आले. या अधिवेशन काळात राज्यातील विविध मागण्यांसाठी ३४ मोर्चा निघणार आहेत. यावेळी विधानभवन प्रवेश कडक करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील विविध भागातील कार्यकर्ते प्रवेश पास नसल्याने बाहेरच आमदार, मंत्र्यांची भेट घेताना दिसत होते.













