विरोधी पक्षच गायब….!

विधानभवनातून
संतोष वायंगणकर
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील आजचा पाचवा दिवस होता. विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात कामकाज उरकून घेतले जात होते. अनेक सदस्यांना आप आपल्या भागातील प्रश्नांची मांडणी करायची होती. पंरतु पंधरा दिवस चालणारे अधिवेशन आठवडाभर होत असल्याने आठवडाभरातच अधिवेशनातील प्रश्नोतर, विधेयक मंजूर करणे, लक्षवेधी आदी लोकशाहीतील सभागृहात वापर करुन जनतेच्या प्रश्नांना सरकारपुढे मांडता येण्याच महत्त्वाचे माध्यम हे विधीमंडळाचे अधिवेशन आहे. असाच आपला पक्का समज आहे.पूर्वी तर अधिवेशनात होणाऱ्या चर्चेतून अनेक प्रश्न मार्गी लागतात. आजही अधिवेशनात अनेक प्रश्न मांडले जात ते सोडवले जातात. अधिवेशनात होणाऱ्या चर्चेतून प्रश्न मार्गी लागत असले तरी यावेळी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच कुठे अस्तित्वच दिसल नाही. विरोधी पक्षाचा आवश्यक असणारा आक्रमकपणा अधिवेशन काळात कुठेही दिसला नाही. विधानसभेत उमेदचे १० माॅल उभारण्यात येणार असल्याचे ग्रामीण विकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी माहिती दिली. पापलेटची चर्चाही आज विधीमंडळात झाली. पापलेटच्या उत्पादना संदर्भात समाज माध्यमांवर होणाऱ्या चर्चेच्या अनुशंगाने मत्य्सद्योगमंत्री ना. नितेश राणे यांनी सभागृहात निवेदन करताना सांगितले की राज्यात पापलेटच्या उत्पादनात वाढ झाली असून किमान कायदेशीर आक्रमणाचे पालन करुन मच्छिमारांना १३४ मिमि वरील पापलेटची मासेमारी करता येणार नाही. पापलेटच्या संवर्धना संदर्भात सरकार सकारात्मक आहे असे ना. नितेश राणे यांनी सभागृहात स्पष्ट केले. पाचव्या दिवशीही नागपूरात अनेक मोर्चा, आंदोलन झाली. शासकीय कर्मचारी यांचा जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी कर्मचार्यांचा विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. तर राष्ट्रीय काँग्रेस तर्फेही बेरोजगांराचा मोर्चा काढण्यात आला होता. आज विधानसभेत सत्ताधारी भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे आक्रमक होताना पहायला मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख आ. उध्दव ठाकरे यांनी आज विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा विरोधी पक्षनेत्याचा विषय चर्चेत आला आहे. विधीमंडळाचे कामकाज असच रेंगाळलेले चालले होते.