वैभववाडी येथील भजन स्पर्धेत सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ कोकीसरे प्रथम 

सिंधुदुर्ग भजनी कलाकार संस्था व ठेकेदार संघटना वैभववाडी यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन 

स्पर्धेला प्रभाकर सावंत, दिलीप रावराणे व संतोष कानडे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडीl प्रतिनिधी :        वैभववाडी येथे आयोजित पालकमंत्री चषक भजन स्पर्धेत सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ कोकिसरे या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ खांबाळे यांनी द्वितीय तर रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ नाधवडे सरदारवाडी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. जिल्हा भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग व ठेकेदार संघटना वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी तालुकास्तरीय स्पर्धा येथील दत्त मंदिर येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत एकूण दहा संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे बक्षीस वितरण सिंधुदुर्ग भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा भजनी कलाकार संस्था अध्यक्ष संतोष कानडे यांच्या शुभहस्ते पार पडले. नामदार नितेश राणे यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम क्रमांक – सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ कोकिसरे बुवा सुशांत सांगवेकर, द्वितीय क्रमांक – विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ खांबाळे बुवा सुहास रवींद्र सुतार, तृतीय क्रमांक – श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ नाधवडे सरदारवाडी बुवा रघुनाथ सहदेव परब, उत्तेजनार्थ विठ्ठल रखुमाई प्रसादिक भजन मंडळ कुर्ली बुवा दीपक नारायण सुतार, त्याचबरोबर उत्कृष्ट पखवाज अमोल पांचाळ (सिद्धेश्वर भजन मंडळ कोकिसरे), उत्कृष्ट तबला प्रेम संदीप मिस्त्री (विश्वकर्मा भजन मंडळ खांबाळे) उत्कृष्ट गायक सुशांत सांगवेकर (सिद्धेश्वर वजन मंडळ कोकीसरे ), उत्कृष्ट कोरस रामेश्वर भजन मंडळ नाधवडे सरदारवाडी, शिस्तबद्ध रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ नाधवडे, उत्कृष्ट झांजवादक विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ कुर्ली.

कार्यक्रमाच्या उद्घाटन तसेच बक्षीस वितरण प्रसंगी वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, बुवा संतोष कानडे, संजय सावंत, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, नासीर काझी, श्रद्धा रावराणे, प्रदीप रावराणे, प्राची तावडे, रवींद्र रावराणे, रितेश सुतार, विकास नर, नेहा माईणकर, संगीता चव्हाण, सुप्रिया तांबे, कौस्तुभ तावडे, उत्तम सुतार, तसेच वैभववाडी भजन संस्था अध्यक्ष उज्ज्वल नारकर, बुवा प्रकाश पारकर, संतोष मिराशी, दीपक पाळेकर, नारायण मेहत्तर, सदानंद कसालकर, गणेश खाडे, योगेश पांचाळ, योगिता परब, अनुज्ञा अंगवलकर व भजनी बुवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रभाकर सावंत, संतोष कानडे, दिलीप रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, नासीर काझी यांनी मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षक म्हणून हेमंत तवटे, ज्ञानदेव मेस्त्री यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी वैभववाडी भजन संस्था, सर्व भजनीबुवा व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर ठाकूर, रितेश सुतार सतीश रावराणे, उज्ज्वल नारकर यांनी केले.