मंडणगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुंबळे येथे गांजांचे सेवन करताना आढळून आलेल्या दोन व्यक्तींच्या विरोधात मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल विनय पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार दि. २६ डिसेंबर रोजी कुंबळे येथील एस.टी. स्टॉपचेमागे सायंकाळी ५ वाजण्याचे सुमारास देवजी विष्णू पवार (४७, राहणार दुधेरे), दिलीप शांताराम पवार (४८, राहणार दुधेरे, ता. मंडणगड) हे दोन आरोपीत एस.टी. स्टॉप पाठीमागे एका झाडाच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर रित्या गांजा सारख्या अंमली पदार्थाचे सेवन करताना मिळून आले. संबंधीतांचे विरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.













