बांदा : प्रतिनिधी : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी बांदा येथील संदीप बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे. संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निलेश खरात यांनी याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र दिले आहे.
पुणे येथे केंद्रीय कार्यकारणी प्रदेश बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा नूतन कार्यकारणीची निवड जाहीर करण्यात आली. केंद्रीय कार्यकारिणीवर आनंद लाड, जिल्हा उपाध्यक्षपदी मोहन गावडे, दिनेश तांबे, जिल्हा सरचिटणीसपदी संजय गोवेकर, जिल्हा कोषाध्यशपदी महेश राऊळ यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, सचिन मेंगाळे, राहुल बोडके, सागर पवार, अमर लोहार, उमेश आनेराव उपस्थित होते.
येत्या काळात संघटनेसाठी सर्वोतपरी काम करणार आहे. कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. कामगारांच्या हितासाठी काम करणार आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप बांदेकर यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे
———–












