धुरीवाडा मार्गांवर पडलेली मोठी फांदी हटवून मार्ग केला मोकळा

नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या तत्परतेने प्रशासनाकडून कार्यवाही : नागरिकांचे मदतकार्य

मालवण | प्रतिनिधी : मालवण धुरीवाडा मार्गांवर झाडाची मोठी जीर्ण फांदी पडल्याने मार्ग बंद झाला. याबाबत माहिती मिळताच नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी नगरपरिषद कर्मचारी यांना तात्काळ त्याठिकाणी बोलावून नागरिकांच्या मदतीने मार्ग मोकळा केला.

यावेळी मोहन वराडकर, मनोज ढोलम, विनायक रेडकर, वैभव तोंडवळकर, गणेश चिंदरकर, सुनील बागवे यावेळी उपस्थित होते.

गुरुवारी सकाळी धुरीवाडा मार्गांवर मोठी फांदी तुटून पडली. या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. याबाबत स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्षा ममता वराडकर यांना माहिती दिली. नगराध्यक्षा यांनी नगरपरिषद प्रशासनास माहिती दिली. प्रशासनाने तात्काळ त्याठिकाणी कर्मचाऱ्यांना पाठवले. नागरिकांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला.