राजापूर प्रतिनिधी : शहरातील आंबेवाडी येथील कै. सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठान आंबेवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात २४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचा शुभारंम राजापूर पोलिस निरीक्षक यादव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी प्रथम रक्तदान करून यादव यांनी शिबीराचा शुभारंभ केला.
याप्रसंगी प्रकाश लोळगे, सुरेश बाईत, अविनाश लोळगे, सतीश बंडबे, रामचंद्र नाखरेकर आदी मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी याप्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महेश बंडबे, भूषण गार्डी, देवेंद्र गार्डी, राकेश कातकर, निलेश नवाले, सागर आंबीलकर, सूरज जड्यार, विशाल बंडबे, ओंकार बंड बे, दिनेश नवले आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. या शिबिरासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालय येथील रक्तपेढी संकलन तील कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.












