विजेच्या खांबावर काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागून तरुण वायरमनचा मृत्यू

राजापूर येथील पेंडखळे भवानी मंदिर येथील घटना 

राजापूर: प्रतिनिधी

मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास पेंडखळे भवानी मंदिर येथे ( राजापूर ) विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक विजेच्या तीव्र धक्क्याने तीथवली येथील रहिवाशी असलेला तरुण वायरमेन अनिकेत परवडी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो सत्तावीस वर्षांचा होता.

ऑपरेटर कडून वीज वाहिनी बंद करून तो दुरुस्तीसाठी खांबावर चढला होता. मात्र विजेच्या तीव्र धक्क्याने तो खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला.. त्याचे पार्थिव सायंकाळी उशिरा येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले.. एका युवक वायरमेनच्या झालेल्या दुर्दैवी अपघाती निधनाने तिथवलीसह राजापूर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.