नूतन तहसीलदार गणेश लव्हे यांचा आंगणे कुटुंबियांकडून सन्मान!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्याचे नूतन तहसीलदार गणेश लव्हे यांनी बुधवारी सकाळी आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेतले. आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने काका आंगणे, बाबू आंगणे यांनी यावेळी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर पुढील महिन्यात होणाऱ्या जत्रेच्या नियोजना संदर्भात माहिती घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांसोबत चर्चा केली. आंगणेवाडीमधील बांधकाम चालू असलेल्या नूतन तलाठी कार्यालयाची सुद्धा पाहणी केली.
यावेळी काका आंगणे, बाबू आंगणे, सतीश आंगणे, मंडळ अधिकारी श्रीमती मिनल चव्हाण, तलाठी श्री लखमोड, पोलीस पाटील पंकज आंगणे, गणेश आंगणे, भरत आंगणे, रुपेश आंगणे, इ. उपस्थित होते.