राजापूर : राजापूर तालुका चर्मकार समाज सेवा संघाची सहविचार सभा रविवार, दिनांक ११ जानेवारी राेजी सकाळी १०:३० वाजता आयाेजित करण्यात आली आहे. ही सभा राजापूर पंचायत समितीच्या किसान भवन येथे आयाेजित करण्यात आली आहे.
तालुका चर्मकार समाज सेवा संघातील सर्व कार्यकारिणी सदस्य, तसेच सर्व गट कार्यकारिणी आणि समाजबांधवांची ही सहविचार सभा आयाेजित करण्यात आली आहे. या सभेत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात येणार आहेत.
या सभेला सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व गटातील कार्यकारिणी सदस्य, समाजबांधव यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रघुनाथ आडिवरेकर आणि रमेश धामापूरकर यांनी केले आहे.













