सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुका वकील संघटनेतर्फे आयोजित ‘लेक्स डिस्कशन’ या व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प नुकतेच सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालयात संपन्न झाले. या सत्रात सिंधुदुर्गच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त न्यायाधीश सौ. अवंतिका गजानन कुलकर्णी यांनी ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०’ या विषयावर मार्गदर्शन केले.
न्यायाधीश सौ. कुलकर्णी यांनी आपल्या व्याख्यानात धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे संस्थेची नोंदणी कशी करावी, संस्थेच्या उद्दिष्टांचे पालन, तसेच बदल अर्ज दाखल करताना कोणत्या नियमांचे पालन करावे लागते, याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी या कायद्यातील क्लिष्ट तरतुदी अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट केल्या. व्याख्यानानंतर त्यांनी वकील आणि विधी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधानकारक निरसन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. बाळाजी बाबुराव रणशूर आणि जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर यांनी न्यायाधीश सौ. कुलकर्णी यांचे स्वागत केले. यावेळी अॅड. राघवेंद्र नार्वेकर, अॅड. नीता गावडे, अॅड. माधवी पेंडूरकर, अॅड. स्वप्नील कोरगावकर, अॅड. सुप्रीम परब, अॅड. हनुमंत गावडे, अॅड. अभिषेक चव्हाण, अॅड. अलका कासकर, अॅड. प्रतीक्षा भिसे, अॅड. राहुल मडगावकर, अॅड. वामन निर्गुण, अॅड. सुमित सुकी, अॅड. सुखानंद सावंत, अॅड. सर्वेश कोठावळे, अॅड. राहुल गायकवाड आणि विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. रत्नाकर गवस यांनी केले तर आभार अॅड. प्रिया भावे यांनी मानले.
या व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान शनिवार, १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सावंतवाडी न्यायालयात आयोजित करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सुप्रसिद्ध वकील अॅड. युवराज नरवणकर हे ‘न्यायालयामध्ये केस चौकशीच्या कामी इलेक्ट्रॉनिक पुरावा कसा सिद्ध करावा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील वकील व विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अॅड. बाळाजी रणशूर यांनी केले आहे.













