सावंतवाडी । प्रतिनिधी :महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षेत सावंतवाडी येथील शांतीनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी १४ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये कु. गार्गी किरण सावंत व पलक प्रशांत पाटणकर या विद्यार्थिनींनी ‘अ’ श्रेणी मिळवली. उर्वरित विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत तर ११ विद्यार्थी ‘क’ श्रेणीत उत्तीर्ण झाले.
तसेच इंटरमिजिएट परीक्षेसाठी २३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये कु. अमित वागाराम सुंदेशा, भूमी गुरुदत्त कामत, काव्या संतोष मडवळ, मृण्मयी मिलिंद तानावडे आणि स्वरदा सिद्धार्थ पराडकर या पाच विद्यार्थ्यांनी ‘अ’ श्रेणी मिळवली. तर ‘ब’ श्रेणीत ८ आणि ‘क’ श्रेणीत १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. संदेश कळंगुटकर यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. विक्रांत विकास भाई सावंत, सीईओ श्री. बाळासाहेब नंदीहळ्ळी, विशेष कार्यकारी अधिकारी श्री. मनोहर वेंगुर्लेकर, मुख्याध्यापक श्री. समीर परब व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.











