प्रतिनिधी/ रोहन कांबळे
राधानगरी : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी झालेल्या अर्ज छाननी मध्ये १५ अर्ज अपात्र झाले आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण ३१० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी १०७ तर पंचायत समिती साठी २०३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.छाननी प्रक्रियेमध्ये १५ उमेदवारांचे अर्ज अपुऱ्या कागदांमुळे अपात्र ठरले आहेत.तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदार संघातील ओबिसी प्रवर्गाचे उमेदवार श्रीकांत चव्हाण यांच्या कागदपत्रांमध्ये जातपडताळणी कागद नसल्या कारणाने त्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात आला.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजयापर्यंत पोहचण्यासाठी राधानगरी तालुक्यात मोठी चुरस लागली आहे.तालुक्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.अद्याप २७ तारखेपर्यंत माघार घेण्याची मुदत असल्यामुळे २७ तारखेला निवणुकीचे पूर्ण स्पष्ट होणार आहे.













