सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…

वीस वर्षांची शिक्षा…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर:अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.या कारवाईसाठी सत्र न्यायाधीश श्रीमती.कविता.बी.अग्रवाल यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय बंडू गोरे (वय ५३, रा. कत्यायनी,ता.करवीर, जि.कोल्हापूर) याने आपल्या सावत्र अल्पवयीन मुलीवर सन २०१३ पासून ते २७ जून २०१९ पर्यंत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. पीडितेच्या असहाय्यतेचा व अल्पवयाचा गैरफायदा घेत आरोपीने आईला ठार मारेल, जीव देईन,तुमची वाट लावेन अशा धमक्या देत अत्याचार सुरू ठेवले होते.अखेर पीडितेने धैर्य दाखवत अखेर राधानगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधान कलम ३७६,५०४,५०६ तसेच पोक्सो कायदा २०१२ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए.एस.लोखंडे यांनी केला.तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणी दरम्यान सहाय्यक वकील ॲड.प्रतिभा जयकर-जाधव यांनी सरकार पक्षातर्फे भक्कम बाजू मांडली. त्यांनी एकूण १४ साक्षीदार तपासून वरिष्ठ न्यायालयाचे दाखले व पुरावे न्यायालयासमोर सादर केले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपिला दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपीस भांदवि कलम ३७६(३),५०४,५०६ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४,६ व १२ अंतर्गत २० वर्षांची सक्त मंजुरी व ३ हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास अतिरिक्त साधी कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे.
या खटल्यात पैरवी अधिकारी विक्रम पाटील (बक्कल नं.२४१२) तसेच तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता लायकर यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले.