गुहागर प्रतिनिधी
जनता सुज्ञ आहे, त्यांना विकास पाहिजे.गुहागर मधील जनता धनशक्तीला झुकणार नाही त्यांना विकास हवा आहे .गावोगावी खेडो – पाडी जी – जी विकास कामे करायची आहेत. आम्ही पूर्ण क्षमतेने लोकांची विकास कामांची स्वप्न नक्कीच पूर्ण करू असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व शृंगारतळी जिल्हा परिषद गटाचे मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात
बोलताना प्रमोद गांधी पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्या आहेत. त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वतीने वतीने महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत असून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
शृंगारतळी जिल्हा परिषद गटात आदरणीय भास्कर जाधव यांनी ही जागा माझासाठी सोडली असल्याने या गटातून मी स्वतः प्रमोद गांधी ही निवडणूक लढवत आहे. आणि शृंगारतळी पंचायत समिती गणातून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून संजय पवार हे निवडणूक लढवीत आहेत तर तळवली पंचायत समिती गणातून संदीप धनावडे हे निवडणूक लढवीत आहेत. आम्ही तिघेही एकत्रित निवडणूक रिंगणात लढत देत आहोत.
धनशक्ती विरोधात जनशक्तीचे आव्हान आहे .आमच्याकडे जनशक्ती आहे .जनता आमच्या पाठीशी आहे .आमच्याकडे धन नसेल पण आमच्याकडे जनता जनार्दन आहे. असे सांगून प्रमोद गांधी पुढे म्हणाले की जनता सुज्ञ आहे त्यांना विकास पाहिजे आहे . जनता धनशक्तीला झुकणार नाही त्यांना विकास पाहिजे. भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येथे चांगला विकास होतोय .त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत .गावोगावी खेडो – पाडी, जी – जी विकास कामे करायची आहेत. त्याप्रमाणे आम्ही ती विकासकामे पूर्ण क्षमतेने करणार आणि लोकांच्या विकास कामांची स्वप्न आहेत ती स्वप्न आम्ही नक्की पूर्ण करू असा विश्वास मनसेचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी व्यक्त केला. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर उपस्थित होते.












