कुणबी विकास मंडळ असोरे यांच्या वतीने उपसभापती निलेश सुर्वे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण

गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील कुणबी विकास मंडळ असोरे (रजि.)यांच्या वतीने असोरे गावात वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम संपन्न झाला. “”आपलं गाव.. आपला अभिमान… विकासासाठी सर्वांचे योगदान”” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन पर्यावरण संवर्धन आणि हरितगृह निर्मितीसाठी असोरे कुणबी विकास मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या वृक्षारोपणाचे वेळी जांभूळ,चिंच आणि बकुळ या प्रकारातील १०० वृक्षांची लागवड यावेळी असोरे गावात विविध ठिकाणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे तरुण तडफदार,अभ्यासू नेतृत्व,तरुणांचे प्रेरणास्थान असणाऱ्या उपसभापती निलेश सुर्वे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी कुणबी विकास मंडळ असोरे मुंबईचे ३२ युवा कार्यकर्ते गावात हजर झाले होते. अनेक धार्मिक,सामाजिक कार्यक्रमासाठी युवकवर्ग आवर्जून येतो मात्र या असोरे गावात मागील ५ वर्ष वृक्षारोपण करण्यासाठी हे युवक येतात ही कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. कुणबी वाडी विकास मंडळ असोरे ज्ञाती सभागृहात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे वेळी विनायक सुर्वे, असोरे कुणबी वाडी विकास मंडळाचे अध्यक्ष दिनेश डिंगणकर, गावातील प्रमुख कृष्णा बादावटे, निवृत्त ग्रामविकास अधिकारी महिंद्र निमकर,संतोष आग्रे. राजेंद्र गोंधळी,रामचंद्र गोंधळी, गोविंद गोंधळी, वसंत बादावटे,बबन बादावटे,सखाराम गोंधळी, विनय गोंधळी, महादेव गोंधळी, शांताराम गोंधळी, बौद्धजन सेवा संघ असोरेचे अध्यक्ष सुनील सुर्वे, सेक्रेटरी सुभाष सुर्वे आदींसह असोरे गावातील बहुसंख्य ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते. या सत्कारावेळी असोरे गावातील सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने या कार्यक्षम ग्रामस्थांसमवेत आपणही कटिबद्ध असल्याचे उपसभापती निलेश सुर्वे यांनी सांगितले.