पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित
वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ दत्त मंदिर येथे प्रचाराचा नारळ वाढवून करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, दिगंबर पाटील, भालचंद्र साठे, शारदा कांबळे, राजेंद्र राणे, बाळा कदम, प्रकाश पाटील, शारदा कांबळे, स्नेहलता चोरगे, श्रद्धा रावराणे, नेहा रावराणे, हुसेन लांजेकर, बाळा हरयाण बंड्या मांजरेकर, संजय सावंत, श्रद्धा रावराणे, प्रदीप रावराणे, महेश संसारे, अंबाजी हुंबे, संजय चव्हाण, बाळा मसूरकर, रवींद्र रावराणे, रितेश सुतार व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच जि. प. चे उमेदवार प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, रिध्दी सुतार, पंचायत समिती उमेदवार देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, साची कोलते, मंगेश लोके, साधना नकाशे, सिद्देश रावराणे यावेळी उपस्थित होते.












