चिरेखाण कामगार महिलांची फसवणूक
चौके प्रतिनिधी :– चौके येथे शनिवारी दुपारीच्या सुमारास भांडी विक्रीच्या नावाने आलेल्या दोन महिलानी बाजारपेठे नजीक भाड्याने राहत असलेल्या चिरेखाण कामगारांच्या घरी जात गोडीगुलाबी ने बोलून अवघ्या दोन तासात कमी किमतीत दागिने मालवणला नेऊन चांगले पॉलिश करून देतो असे सांगत मंगळसूत्र,कानातील,पायतील पैंजण असे दोन कामगार महिलांचे दागिने घेऊन पसार झाली. दोन तास होऊन गेले तरी दागिने घेऊन गेलेली महिला आली नसल्याने आपल्याला फसवले गेले याची कल्पना आली फसल्या गेलेल्या कामगार महिलांनी पॉलिश करणाऱ्या महिलांना शोधण्यासाठी मालवण गाठले मालवणला चौकशी करून अखेर आपण फसलो गेले असल्याने मालवण पोलीस ठाणे येथे धाव घेतली असे समजते. गेले काही दिवस भांडी विक्रीच्या नावाने त्या महिला गावात फिरत असल्याचेही ग्रामस्थांतून सांगितले जाते.चौके गावात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.महिला वर्गात चोरीचा घटनेची जोरदार चर्चा चालू आहे.











