ओटवणे (प्रतिनिधी ) रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालय कोल्हापूर चा विद्यार्थी,सिंधुदुर्ग जिल्यातील दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावच्या गणपत नंदकुमार कासकर याच्या कलाकृतीस राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून त्याच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.उपयोजित कला विभागातून त्याच्या कलाकृतीला बहुमान मिळाला असून ए. टी. डी. विभागातील विश्रांती कुंभार हिच्या कला कृतीला गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे.
कला संचालना मार्फत दरवर्शी राज्यातील 300 पदवी पदवीकांचे कला शिक्षण देणाऱ्या म्हविद्यालतील 11 विविध विभागातील कलाकृतींचे प्रदर्शन भरविले जाते. यात हजारो कलाकृती या प्रदर्शनात सादर केल्या जातात यातून निवडक कलाकृतींची यासाठी निवड केली जाते. याच प्रदर्शनात रा. शि. गोसावी कलानिकेतन महविद्यालयातील फौंडेशन ए. टी. डी. आणि उपयोजित कला विभागातून एकूण 57कलाकृतिची निवड झाली.यात फौंडेशन च्या 2,ए. टी. डी. विभागातून 15 आणि उपयोजित कला विभागातून 40 कलाकृतींची निवड करण्यात आली आहे.आणि हे प्रदर्शन 9 ते 15 फेब्रुवारी पर्यंत कला विश्व महाविद्यालयात भरवीले जाणार आहे. रा. शी. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे तसेच गणपत कासकर याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. या यशस्वी मुलांना यशात प्राचार्य मनोज दरेकर, गजेंद्र वाघमारे, मनिपज्ञ हर्षवर्धन,शैलेश राऊत,किशोर राठोड,मंगेश शिंदे,संदीप पोपेरे,वैशाली पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.









