दोडामार्ग तालुक्यात राजकीय रंगत; २२ उमेदवारांची माघार, कोलझरमध्ये ‘धनुष्यबाण’ची पहिली सरशी, सेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस बिनविरोध

​दोडामार्ग: सुहास देसाई
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोडामार्ग तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. एकूण २२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, कोलझर पंचायत समिती गणातून शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाली असून, महायुतीने निवडणुकीचे खाते उघडले आहे.

​कोलझरमध्ये ‘बिनविरोध’ गुलाल, युतीच्या कार्यकर्ते यांनी उधळला मात्र पण ठाकरे गट आक्रमक झाला असला तरी त्याचे अधिकृत उमेदवार प्रवीण परब यांनी माघार घेण्याची वेळ आली असल्याने नामुष्की पत्करावी लागली आहे

​कोलझर गणातून ६ पैकी ५ उमेदवारांनी माघार घेतल्याने गणेशप्रसाद गवस यांचा मार्ग मोकळा झाला. मात्र, ठाकरे शिवसेनेचे उमेदवार प्रवीण परब यांनी अनपेक्षितपणे माघार घेतल्याने ठाकरे पक्षात खळबळ माजली आहे. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि तालुकाप्रमुख संजय गवस यांना युतीच्या वतीने जोर का झटका दिला अशी चर्चा रंगली आहे

​जिल्हा परिषदेचे रणमैदानात कुठे दुहेरी, कुठे बहुरंगी लढत अशी लढत होणार आहे

​मणेरी गट जिल्हा परिषद मध्ये सुनिता भिसे (अपक्ष), ललिता ताटे (ठाकरे शिवसेना) आणि साक्षी तळवडेकर (शिंदे शिवसेना) यांच्यात तिहेरी लढत होईल.

​साटेली भेडशी जिल्हा परिषद मध्ये तीन अपक्ष उमेदवारांच्या माघारीनंतर आता सुनंदा धर्णे (ठाकरे शिवसेना) विरुद्ध श्वेता धर्णे (भाजपा) अशी थेट लढत रंगणार आहे.

​माटणे गट जिल्हा परिषद मध्ये बंडखोर आणि एबी फॉर्म नसलेल्या उमेदवारांनी माघार घेतली असली तरी, बाबुराव धुरी (ठाकरे शिवसेना), दिपक उर्फ रामा गवस (भाजपा) आणि अपक्षांसह पंचरंगी लढत पाहायला मिळेल.

​पंचायत समिती गणांमधील चित्र
​मणेरी येथे ६ उमेदवारांमध्ये लढत होणार असून यात प्रामुख्याने ठाकरे शिवसेना, भाजपा आणि अपक्षांचा समावेश आहे.
​कोनाळ पंचायत समिती मध्ये येथे ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना आणि अपक्ष अशी तिहेरी लढत निश्चित झाली आहे.
​झरेबांबर पंचायत समिती मध्ये स्नेहा गवस (शिंदे शिवसेना), विनिता घाडी (ठाकरे शिवसेना) आणि वृषाली गवस (अपक्ष) यांच्यात सामना होईल.

​साटेली भेडशी पंचायत समिती मध्ये य काँग्रेस, भाजपा, ठाकरे शिवसेना आणि अपक्ष यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.
​माटणे पंचायत समिती मध्ये प्रिया नाईक (ठाकरे शिवसेना), पार्वती गवस (भाजपा) आणि सुप्रिया नाईक (अपक्ष) यांच्यात सामना रंगणार आहे.

​तालुक्यात अनेक ठिकाणी बंडखोरी शमवण्यात पक्षांना यश आले असले, तरी काही जागांवर अपक्ष आणि बंडखोरांनी आपले आव्हान कायम ठेवले आहे. आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष मतदानाकडे लागले आहे.

कोलझर पंचायत समिती मध्ये बिनविरोध निवड झाली त्या बद्दल शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांचे भाजपा तालुकाध्यक्ष दिपक गवस यांनी अभिनंदन केले यावेळी युतीचे उमेदवार व सर्व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला यावेळी मोठ्या संख्येने युतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते