मांडवी खाडीत केली प्रात्यक्षिके
वेंगुर्ले : प्रतिनिधी : वेंगुर्ले तालुका आपती व्यवस्थापन अधिपत्यातील असलेले साहित्य लाईफ बॉय टॉर्थ स्पीड बोट, लाईफ किट कटर्स आदी पूर परिस्थितीमध्ये आवश्यक साधन सामुग्राची तपासणी तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केली.
यावेळी श्री. ओतारी आणि नायब तहसीलदार अभिजीत हजारे तसेच पोलीस उपनिरीक्षक वासुदेव परब, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, सहाय्यक होम गार्ड तुषार केळुस्कर, होमगार्ड जगन्नाथ शेटकर, होमगार्ड किरण खरात आदींच्या सहभागांत मांडवी खाडीत स्पीडबोट फिरवून व साहित्याचे प्रात्यक्षिकांतून माहिती घेऊन तपासणी केली.












