रत्नागिरी: शेकोटी घेताना तोल जाऊन पडल्याने ९४ वर्षीय वृद्ध महिला भाजली; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहराजवळील टाकळेवाडी-फणसोप येथील वृद्ध महिला चुलीजवळ शेकोटी घेत असताना तोल जावून पडली. यामध्ये ती २० टक्के भाजली उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुष्पलता सदाशिव साळवी (९४, रा. टाकळेवाडी, फणसोप, रत्नागिरी) असे भाजलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवार 28 जानेवारी रोजी सायंकाळी 4.45 वा च्या सुमारास घडली. पुष्पलता साळवी या चुलीजवळ शेकोटी घेत होत्या चुलीवर पाणी तापविण्यासाठी पातेले ठेवलेले होते. शेकोटी घेताना वृद्ध महिलेचा तोल गेला आणि ती पडली आणि गरम पाणी तिच्या अंगावर पडले. यामध्ये त्या ३० टक्के भाजल्या. तात्काळ उपचारासाठी त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.