रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या प्रशांतनगर येथील घराच्या पार्किंगमधील दुचाकी अज्ञाताने लांबवली. ही घटना मंगळवार 27 जानेवारी रोजी रात्री 10 ते 11.15 वा.कालावधीत घडली आहे.
शेखर प्रकाश भोंबल (33,मुळ रा.कोळंबे टेंबवाडी सध्या रा.प्रशांतनगर विमानतळाशेजारी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,मंगळवारी रात्री 10 वा.सुमारास त्यांनी आपली शाईन दुचाकी (एमएच-08-एटी-2093) घराच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. रात्री 11.15 वा.सुमारास ते घराच्या पार्किंगमध्ये गेले असता त्यांनी आपली दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी आजुबाजुला दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी मिळून न आल्याने आपली दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.












