झुंजार पेडणेकर | मसुरे
मालवण तालुक्यातील श्री क्षेत्र गवळदेव नवपाटवाडी, वडाचापाट येथे शैक्षणिक सांस्कृतिक ग्रामविकास मंडळ नवपाटवाडी वडाचापाट यांच्या वतीने
त्रैवार्षिक उत्सवा निमित्त
१ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता
श्रीसत्यनारायण महापूजा व तिर्थप्रसाद
दुपारी ३.०० वाजता
हळदीकुंकू समारंभ,
सायं. ४.०० वाजता
महिलांसाठी खास करमणुकीचे खेळ,
सायं. ७.०० वाजता
भजन श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळ
मु. लिंगडाळ, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
बुवा संदीप लोके,पखवाज योगेश सामंत, तबला संदेश सुतार. रात्री ८.०० वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा (लहान गटातील मुला-मुलींसाठी), रात्री ९.०० वाजता महिलांचा ग्रुप डान्स, रात्री १०.०० वाजता बक्षिस वितरण समारंभ, त्यानंतर ट्रिकसिन युक्त
दशावतार नाट्यप्रयोग
‘दख्खनचा राजा, जोतिबा माझा ‘
जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ
दांडेली आरोस, ता. सावंतवाडी यांच्या कडून घुबडावरून महालक्ष्मी चे दर्शन, अवकाशात अधातंरी तीन्ही देवतांचे दर्शन
दिव्य जोती मधून जोतीबा प्रगट, यमाईचा अवतार,घोड्यावरुन जोतीबाचे आगमन,
अघोरी भैरव रुपात जोतीबा प्रगट,घुबड आणी असुराचे युद्ध,
महाकाय वारुळातून राक्षस बाहेर,राखणदार स्वरूपात जोतीबा,
विचीत्र महाकाय प्राणी रंगमंचावर, विचीत्र प्राण्याचे जोतीबा सोबत युद्ध, विराट स्वरूप ऑदासुराचा शेवट,
आगळा वेगळा महालक्ष्मी चा गोंधळ त्यातून जोतीबा दर्शन,
रत्नागीरी वाडी येथील मंदीरातील पुर्ण स्वरूप जोतीबा, आरती दर्शन सोहळाआदी ट्रिक सिन दाखविण्यात येणार आहेत. जोतिबाच्या आक्रमक ५ विविध रुपात युवा श्री. गौरव शिर्के भूमिका साकारणार आहेत. उपस्थितीचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.











