सर्वसामान्य जनतेसाठी मी केलेल्या कामाची पोचपावती या निवडणूकीत जनता मला देईल-अभिजित गुरव

आपला हक्काचा लोकप्रतिनिधी धोपेश्वर गणातील मतदार पंचायत समितीत पाठवतील
राजापूर प्रतिनिधी       मी कायमच राजकारणापेक्षा समाजकारणावर भर दिलेला आहे. त्यामुळे गेली १५ वर्षें सामाजिक व राजकिय क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य जनतेसाठी आपण जे योगदान दिले आहे, त्याची जाणीव ठेऊन माझ्या धोपेश्वर गणातील जनता मला नक्कीच पंचायत समितीच्या सभागृहात पाठवेल असा विश्वास धोपेश्वर पंचायत समिती गणातील महायुतीचे उमेदवार अभिजित गुरव यांनी व्यक्त केला आहे.
आपण खरं तर जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होतो, तशी तयारीही केली होती. मात्र राजापुरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत महायुती झाली असून महायुतीकडून धोपेश्वर पंचायत समिती गणाची जागा ही भाजपाला देण्यात आली आहे. भाजपाकडून या गणातुन मला उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचा निर्णय व पक्षाचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता असल्याने मी हा निर्णय मान्य करून धोपेश्वर पंचायत समिती गणातुन निवडणूकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे गुरव यांनी सांगितले.
मी गेली दहा ते पंधरा वर्षे सामाजिक व राजकिय काम करत आहे. या काळात मी माझ्या या धोपेश्वर पंचायत समिती गणात वा पंचक्रोशीपुरते मर्यादीत काम न करता कायमच तालुक्यातील जनता हाच केंद्र बिंदू ठेऊन काम केले आहे. आजही ग्रामीण भागात अनेक सेवा सुविधांचा अभाव आहे हे कायमच त्या त्या भागात फिरत असताना दिसले आहे, या सेवा अधिक चांगल्या करायच्या आहेत. आज ग्रामीण भागातील जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, रात्री अपरात्री रूग्णालयात येताना वाहन उपलब्ध होत नाही, वैद्यकिय सेवा वेळत मिळत नाहीत अशा अनेक समस्या आहेत.
आपण आजपर्यंत प्रत्येक वेळी आपल्या परिने प्रत्येकाला सहकार्य व मदतीचा हात देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. रात्री अपरात्री जनतेसाठी आपण कायमच उपलब्ध राहिलेलो आहोत व यापुढेही रहाणार आहोत. कोणताही प्रश्न असो, अन्याय असो त्या विरोधात प्रसंगी रस्तावर उतरून प्रसंगी प्रशासनाच्या विरोधात उभा राहिलेला आहे. त्यामुळे माझ्या या कामाची जाण नक्कीच माझ्या गणातील जनतेला आहे आणि त्यामुळेच जनता या निवडणूकीत माझ्या पाठीशी ठाम राहिल असा दावाही गुरव यांनी केला.
सामाजिक कामाला राजकारणाची जोड हवी कारण त्यातुन जनतेचा विकास करणे शक्य होते, त्यासाठी या निवडणूकीत आपण उतरलो असून एक हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून धोपेश्वर गणातील जनता मला काम करण्यासाठी पंचायत समिती सभागृहात पाठवेल असा विश्वास गुरव यांनी व्यक्त केला.
फोटो अभिजित गुरव.