रत्नागिरी : प्रतिनिधी
जिल्ह्यात चोरीचे प्रकाऱ उघड होत आहे. चोरट्यानी ग्रामीण भागातून शहरानजीकच्या ठिकाणी लक्ष केल्याचे दिसत आहे. नुकतेच शिळ-वाडकरवाडी येथे चोरट्याने भरदिवसा घरफोडी केली. या घरफोडीत चोरट्याने सोन्याचे दागिने असा ५ लाख १० हजाराचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ३१ जानेवारीला सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.30 वा. सुमारास शिळ-वाडकरवाडी येथे घडली. फिर्यादी निलेश नारायण भातडे ( ५२, रा. शिळ-वाडकरवाडी, रत्नागिरी) हे व कुटुंबिय शनिवारी घरात नसताना अज्ञात चोरट्याने घराचा पाठीमागचा लाकडी दरवाजा जोरात ढकलल्यामुळे दरवाजाची मधील व वरील कडी उचकटून उघडून त्या दरवाजातून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले ४ लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र त्यामध्ये सोन्याचे पेडट त्याचे वजन ५३.४३० ग्रॅम वजनाचे, १२.००० ग्रॅम वजनाचा ८० हजाराचा सोन्याचा हार, ३० हजार रुपयांची एक सोन्याची अंगठी तीचे वजन ३.००० ग्रॅम असा ५ लाख १० हजाराचे दागिने चोरट्याने पळविले. या प्रकरणी फिर्यादी निलेश भातडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.











