मळगांव कुडववाडी येथील प्रमोदीनी कुडव यांचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगांव

कुडववाडी येथील रहिवासी श्रीमती प्रमोदीनी रघुनाथ कुडव यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्या अत्यंत मनमिळाऊ आणि धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, मुलगी, जावई, नातू आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.