विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर रत्नागिरी शहर पोलिसांची मोठी कारवाई; प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी| प्रतिनिधी
शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी प्राध्यापकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन 2021 ते 2026 या कालावधीत घडली आहे.

दिलिप ज्ञानेश्वर जाधव (45,मुळ रा.सावर्डे,चिपळूण सध्या रा.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित प्राध्यापकाचे नाव आहे. हा प्राध्यापक पिडीता इयत्ता 10 वीत असल्यापासून तिच्या ओळखीचा होता. पिडीता अकरावीसाठी या महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यापासून संशयित प्राध्यापकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. दरम्यान याबाबत पिडीतेने आपल्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरुन शहर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत