वैभववाडी येथील रिदम प्ले स्कूल चे स्नेहसंमेलन जल्लोषात 

वैभववाडी l प्रतिनिधी :       स्वर्गीय टक्के गुरुजी प्रतिष्ठान संचलित रिदम प्ले स्कूल वैभववाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन स्कूलच्या रंगमंचावर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ३ ते ६ या वयोगटातील विद्यार्थ्यांनी अनेक कलाविष्कार सादर केले. संचालिका सौ सलोनी टक्के व टक्के गुरुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संतोष टक्के यांनी अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केली होती. आकर्षक रंगमंच, विद्युतरोषणाई करण्यात आली होती.

यावेळी डॉ. डी.आर. पाटील, बँक ऑफ इडियाचे मॅनेजर विश्वेश मयेकर, डॉ. दीपा पाटील, शेतीनिष्ठ शेतकरी मंगेश कदम, प्राध्यापक सिरसट, प्रा गोपुला, प्रा.भास्कर, सुरेश पटेल, किरण मेथे, सागर मसाल, राहुल गावडे, स्वप्नील शिर्के, अमोल पाटील,आनंदा पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन रावराणे, डॉ सनी पाटील, सुहास कांबळे,विस्तार अधिकारी अडूळकर, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अद्यक्ष विद्याधर सावंत, गणेश भोवड, अंकुश जाधव, सचिन माईणकर, सिद्धेश रावराणे, दिलीप माकुती यांच्या प्रमुख उपस्थितीत स्नेहसंमेलन पार पडले. आकर्षक सजावट,विद्युत रोषणाई,साउंड व्यवस्था आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. मुलांनी केलेल्या महाराष्ट्रातील संतपरंपरेच्या वेशभूषणांनी वातावरण भक्तिमय झाले होते. मुलांच्या शैक्षणिक विकासा बरोबरच सर्वांगीण विकासासाठी टक्के उभयता गेली १५ वर्ष करीत असलेल्या कार्याबद्धल पालकांनी त्यांचे कौतुक केले. आम्ही शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात करीत असलेले कार्य हे पालकांच्या व अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांच्या प्रोत्साहणातून व सहकार्याने करत असल्याचे श्री संतोष टक्के यांनी यावेळी सांगितले व सर्वांचे आभार मानले.