शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचा तडकाफडकी राजीनामा 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले येथील आजच्या शिवसेनेच्या मासिक सभेत शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या तडकाफडकी निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मासिक सभेमध्ये सचिन वालावलकर यांनी हा निर्णय जाहीर करताच सर्वांना धक्का बसला. त्यांनी आपल्या राजीनाम्या मागचे कोणतेही कारण स्पष्ट केले नाही. मात्र शिवसैनिक म्हणून मी सदैव सगळ्यांबरोबर राहीन असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी पुढे काय निर्णय घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण सचिन वालावलकर हे आमदार दीपक केसरकर यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात.