बांदिवडे येथे 21 रक्तदात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

▪️बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर :    रक्तदानाला सर्वात श्रेष्ठ दान असं मानलं जातं आपण केलेल्या रक्तदानातून कोणाचातरी जीव वाचण्यास मदत होणार आहे. या संघाकडून यापुढेही असेच समाज उपयोगी उपक्रम राबविले जातील असे प्रतिपादन अध्यक्ष आनंद परब यांनी येथे केले

बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन जि. प. शाळा नं. २ मध्ये करण्यात आले होते या शिबिरामध्ये 21 रक्तदात्यांनी सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपली.

या कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन तसेच शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ संघाचे अध्यक्ष श्री. आनंद परब, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहीत दनाणे, नर्सिंग ऑफिसर श्री. सुमंगल कुगडे, समाजसेवा अधीक्षक श्री. भूषण मळेकर, रक्तपेढी तंत्रज्ञ श्रीमती मयुरी शिंदे, रक्तपेढी सहाय्यक श्रीम. ऋतुजा हरमलकर, पोलीस पाटील श्री. संदेश पवार, बांदिवडे विकास वि. सोसायटी अध्यक्ष श्री. प्रफुल्ल प्रभू, माजी उपसरपंच श्री. किरण पवार, संघाचे उपाध्यक्ष श्री. विलास परब, सचिव श्री. उदय सावंत, खजिनदार श्री. अजय घाडीगावकर, श्री. शंकर आईर, सतिश आईर, दिनेश परब, प्रशांत परब, रमेश मेस्त्री, सुनिल धाडी, विकास धाडी, संदिप घाडीगावकर, सुनिल घाडीगावकर, रामचंद्र माळकर, अंजली घाडीगावकर, स्वाती आईर, ऋषीकेश जाधव, प्रथमेश धाडी, गणेश मांजरेकर, प्रविण झोरे, सौ. मयुरी राणे, सौ. स्वाती आईर,

सौ. वैष्णवी घाडी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्र संचालन श्री. उमेश परब यांनी केले. यावेळी सर्व रक्तदात्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने देण्यात आले.

श्री. संदेश पवार, श्री. कमलेश परब, श्री. खेमजी घाडीगावकर

, श्री. हर्षल प्रभू, श्री. अमित जोशी,श्री. जगदीश मुळे, श्री. भावेश आईर, श्री. दिनेश परब, श्री. उमेश परब, श्री. शैलेश राणे, सौ. अंजली घाडीगावकर, श्री. सुनिल घाडी,श्री. सागर आरेकर, श्री. साई परब, श्री. संदीप आईर, श्री. शुभम घाडी, सौ. अनुष्का परब, श्री. अजय घाडीगावकर,

श्री. मंगेश (सोन्या) परब, श्री. दिपक घाडी, विकास घाडी, यांनी रक्तदान केले. आभार आनंद परब यांनी मानले