पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे प्रतिपादन
▪️आंगणे कुटुंबीयांकडून मान्यवरांचा सत्कार
मसुरे | झुंजार पेडणेकर
आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांचे जत्रा उत्सवातील नियोजन हे सुयोग्य आणि भाविकांना लवकरात लवकर दर्शन देण्यासाठी उपयुक्त असते. खरोखरच त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढेच थोडं आहे. शासन, प्रशासन आणि आंगणे कुटुंबीय यांच्या संयुक्त नियोजनातून भराडी मातेचा हा उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्ती पूर्ण वातावरणात साजरा होतो. आज जो या ठिकाणी माझा सत्कार झाला याबाबत मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो. सर्वांना चांगले आरोग्य आणि सर्वांच्या ईच्छा भराडी देवीने पूर्ण कराव्यात अशी प्रार्थना देवी चरणी केल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई, आंगणे कुटुंबिय आंगणेवाडी आणि आंगणेवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या वतीने आंगणेवाडी येथे जत्रा उत्सवात चांगले काम करणारे अधिकारी तसेच अन्य मान्यवरांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष सतीश उर्फ छोटू आंगणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
आंगणेवाडीच्या पुण्यभूमीतील आजचा हा सत्कार हा जगत जननी श्रीदेवी आई भराडी मातेचा प्रसादच आहे असं मी समजतो. यापुढेही मातेची सेवा करण्याचे भाग्य आम्हा सर्वांना मिळू दे आणि आंगणे परिवाराचे प्रेम नेहमी असंच पाठीशी राहू दे असे प्रतिपादन मालवण पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी केले.
यावेळी पोलीस दलाची शान आणि आंगणेवाडी यात्रा उत्सवात विशेष कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर, ज्येष्ठ नाटककार नरेंद्र आंगणे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सांडव, युवा कार्यकर्ते देवेंद्र उर्फ आबा आंगणे डॉ. विश्वास साठे, डॉ. पटवेकर यांचादेखील विशेष गौरव करण्यात आला.या वेळी मंडळाचे अध्यक्ष सतीश उर्फ छोटू आंगणे, उपाध्यक्ष आनंद आंगणे, सेक्रेटरी काका आंगणे, कार्याध्यक्ष बाळा आंगणे, मधुकर आंगणे, प्रसाद आंगणे, गजानन आंगणे, समीर आंगणे, नंदू आंगणे, संकेत आंगणे,महेश पटेल, सचिन आंगणे,तारक कांबळी, पंकज आंगणे, जयेश आंगणे, जयवंत आंगणे, तनुराज आंगणे, दिनेश आंगणे, बाबू आंगणे, कुणाल आंगणे, महेश आंगणे, गणेश आंगणे, आबा आंगणे, निशिकांत आंगणे, विलास आंगणे, प्रकाश आंगणे, भास्कर आंगणे, बाब्या आंगणे, पप्पू राणे, सुधा आंगणे, अक्षय आंगणे, चंद्रशेखर आंगणे, अमोल आंगणे, अनंत आंगणे, नितेश वंजारे, अंकुश कांबळी, शैलेश आंगणे, पंकज आंगणे, विनोद आंगणे, बंटी अंगणे, सुयोग आंगणे, समीर आंगणे, रघुनाथ आंगणे, निशिकांत आंगणे, बाब्या आंगणे, राजू आंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन उर्फ बाबू आंगणे यांनी मानले .










