बांदिवडे पालयेवाडी येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन!

मसुरे | झुंजार पेडणेकर :अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘बांदिवडे ग्रामस्थ संघ’ यांच्या वतीने यंदाही ‘शिवजन्मोत्सव सोहळा १९ फेब्रुवारी २०२६ रोजी जि.प. शाळा बांदिवडे पालयेवाडीच्या भव्य पटांगणावर संपन्न होणार आहे.

या सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९:३० वा. मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन आणि महाआरती.

सकाळी ११:३० ते १२:३० वा.: गावातून भव्य मोटरसायकल रॅली,

दुपारी २:०० ते ५:०० वा.: शिवकालीन व संतकालीन विषयांवर आधारित ‘खुली रांगोळी स्पर्धा’,

दुपारी ५:०० ते ६:३० वा.: शालेय विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा व पोवाडा गायन,

सायंकाळी ६:३० ते ७:०० वा.: महाराजांच्या चरणांशी ३९६ दिव्यांचा दीपोत्सव व स्वागतगीत,

सायंकाळी ७:०० वा.: अंगणवाडी ते इयत्ता ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तूंचे वाटप,

सायंकाळी ७:३० वा. जि.प. शाळा पालयेवाडी नं. १ च्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक एकांकिका.उपस्थितीचे आवाहन बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने करण्यात आले आहे.