संपूर्ण कर्जमाफीची मागणी
देवगड : प्रतिनिधी
आंबा उत्पादक व शेतकरी यावर्षी मोठ्या आस्मानी संकटात सापडला आहे.राज्य सरकारने संकटात सापडलेल्या आंबा बागायतदारांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी पाच लाख रूपये मदत आदी मागण्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास 12 मार्च रोजी आंबा बागायतदार शेतकèयांचा ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची घोषणा स्वाभिमान शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी देवगड येथे आंबा उत्पादक शेतकèयांचा एल्गार मेळाव्यात केली.आंबा बागायतदार शेतकèयांचा मागण्यांबाबत 20 दिवसांचा अल्टीमेटम शेट्टी यांना सरकारला दिला असून मोर्चा काढूनही न्याय न मिळाल्यास मुंबई गोवा हायवे बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला.
आंबा बागायतदार शेतकरी एवढ्या मोठ्या संकटात असताना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना आहेत त्यामुळे त्यांनी फलोत्पादन मंत्री, कृषी व फलोत्पादन खात्याचे सचिव व तीन जिल्ह्यांचे पालकमंत्री यांची संयुक्त बैठक घेवून निर्णय घ्यावा अन्यथा मोठे आंदोलन उभे राहील्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेट्टी यांनी दिला.
जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे बुधवारी आंबा बागायतदार व व्यापारी संघ देवगड आयोजित आंबा बागायतदार व व्यापारी यांचा एल्गार मेळावा संपन्न झाला.या मेळाव्याला मोठ्या संख्येने आंबा बागायतदार,शेतकरी उपस्थित होते.या मेळाव्याला प्रमुख वक्त म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी हे उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर उद्योगपती नंदकुमार घाटे, आंबा बागायतदार सुधीर जोशी,संघटनेचे अध्यक्ष काका ढोके, स्वाभिमानी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गडयानकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित आंबा बागायतदार व शेतकरी यांना संबोधितांना राजू शेट्टी यांनी शेतकèयांना कर्जमुक्ती, हेक्टरी पाच लाख रूपये रकमेची नुकसानभरपाई, शाश्वत बाजारपेठेची हमी, कीटकनाशक कंपन्यांवर नियंत्रण व आंबा संशोधन केंद्राची निर्मिती या पाच प्रमुख मागण्यांचा ठराव या मेळाव्यात मांडला.या ठरावाला सर्वांनी एकमताने मंजुरी दिली.ठराव घेतलेल्या मागण्यांसाठी राज्यशासनाला 20 दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला असून मागण्या मान्य न झाल्यास 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आंबा बागायतदार व शेतकèयांचा भव्य मोर्चा ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल अशी घोषणा यावेळी राजू शेट्टी यांनी केली.मोर्चोमध्येही निर्णय न झाल्यास त्याच दिवशी मुंबई गोवा महामार्ग रोखण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
कोकणातील आंबाबागायतींसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्यसरकारने पुढाकार घ्यावा आणि हेक्टरी पाच लाख रूपये नुकसानभरपाईची तरतुद अर्थसंकल्पात करावी व ती अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाने जाहीर करावी.आंबा बागायतदार आस्मानी संकटात असताना राज्याचे मुख्यमंत्री काय करीत आहेत.त्यांनी संबंधित खात्याचे मंत्री, सचिव व सिंधुदूर्ग, रत्नागिरी रायगड या तीन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री यांची बागायतदारांच्या प्रश्नाबाबत बैठक घेवून धोरणात्मक निर्णय घ्यावा अन्यथा जनआंदोलन उभारावे लागेल असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला.बागायतदारांच्या प्रश्न मिटला तर प्रश्न ज्यांनी मिटविला त्यांचा अभिनंदनाचा मेळावा घेवू व त्या मेळाव्यात त्यांचा सत्कार करू असेही शेट्टी यांनी सांगीतले.नुकसानभरपाई देताना ज्या आंबा व्यापाèयांनी कराराने बागा घेतल्या आहेत त्यांनाही नुकसानभरपाई मिळाली पाहिजे याचाही विचार करावा.पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी तज्ञ बागायतदार शेतकèयांची समिती गठीत करून त्यांचा सुचनेनुसार निकष बदलाबाबत निर्णय घ्यावा.आंबा संशोधन केंद्र देवगड येथे करण्यात यावे व ते अद्ययावत असावे,औषध विक्रेते व कंपन्यांनी बागायतदारांसमोर निर्माण झालेल्या सध्याचा भयावह परिस्थितीमध्ये त्यांना सहकार्य करावे.त्यांना त्रास दिल्यास स्वाभिामनी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही असा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला.
राजू शेट्टी यांनी कृषी विभागाच्या व वीमा कंपन्यांचा कार्यपध्दतीवरही हल्लाबोल केला.विमा कंपन्यातील अधिकारी व कृषी विभागाचे व शासनाचे संबंधित अधिकारी हे एकत्रित बसून अहवाल तयार करून शासनाकडे सादर करीत आहेत.सध्याचा आस्मानी संकटाबद्दलही देवगडमध्ये संबंधित खात्याचे अधिकारी यांनी केलेला अहवालच शेट्टी यांनी बागायतदारांसमोर वाचून दाखविला यामध्ये सद्य परिस्थिती नमुद केली मात्र नव्याने मोहर येत आहे तो शेतकèयांनी सांभाळणे आवश्यक आहे असे नमूद केले आहे.अशाप्रकारे अहवाल तयार करून राज्यकर्त्यांना खुश करणाèया खुशमस्कèयांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी कृषी विभाग, विमा कंपन्या यांना दिला.शेतकèयांचा पैशातून हजारो कोटीचा नफा विमा कंपन्यांनी कमविला आहे.राज्य शासन व केंद्र शासनाच्या तिजोरीवरच दरोडा त्यांनी टाकला आहे असा गंभीर आरोप शेट्टी यांनी यावेळी केला.
आंब्याची परिस्थिती यावर्षी एवढी भयावह आहे मात्र त्याबाबत बागायतदार शेतकरी यांच्याशिवाय कोणीच बोलत नाही.सर्व झोपले आहेत त्यांना जागे करण्यासाठी आपण आलो आहोत.येथिल शेतकरी आंबा बागयतदारांचा पाठीशी आमची संघटना कायम उभी राहील.पाच बोटे विखुरलेली आहेत तशी अवस्था कोकणी माणसाची आहे.कोकणी माणूस संघटित होत नाही हे दुदैवी आहे.परंतू आता सर्व बोटे एकत्र करून वज्रमुठ तयार करा व संघटित होवून लढा.येथून पुढे प्रत्येक लढाईत मी व माझी संघटना तुमच्या पाठीशी आहे असे शेट्टी यांनी ठामपणे सांगीतले.यावेळी त्यांनी वाशी मार्केटमधील व्यापाèयांवरही निशाना साधला.सध्या बागायतदार शेतकरी संकटात आहे त्यांना सहकार्य करा अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा इशारा शेट्टी यांनी दिला.कीटकनाशके कंपन्यांच्या औषधांचीही कृषी खात्याने चौकशी केली पाहिजे.दिलेली कीटकनाशके योग्य आहेत का याची चौकशी होणे आवश्यक आहे.कीटकानाशके कंपनी व विक्रेत्यांनी बागायतदारांना त्रास दिल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा शेट्टी यांनी दिली.
यावेळी आंबा बागायतदार व व्यापारी संघाचे अध्यक्ष काका ढोके, सुधीर जोशी विद्याधर जोशी, किरण टेंबुलकर, विनायक जोईल,सौ.शामल जोशी, गणेश गावकर, राजेंद्र गडयानकर, संदीप साटम, नरेश डामरी, कृष्णा मिठबांवकर आदींनी विचार व्यक्त केले. सुत्रसंचालन सागर जोईल तर आभार गणेश गावकर यांनी मानले.













