शृंगारतळी जि. प. गटाचे नवनिर्वाचित सदस्य प्रमोद गांधी यांचा सत्कार

गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
श्रृंगारतळी येथील मनसे संपर्क कार्यालयामध्ये जानवळे मनसे शाखा व गावाच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर व जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गांधी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जानवळे गावच्या श्री महालक्ष्मी समूह, श्री समर्थ समूह, ओम साई समूह यांच्या वतीने सुद्धा प्रमोद गांधी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनसे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे, शृंगारतळी शहराध्यक्ष वेदांत देवळेकर, उपविभाग अध्यक्ष विश्वजीत पोतदार, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव,महाराष्ट्र सैनिक विजय शिंदे ,विवेक जानवळकर व समूहातील सर्व महिला उपस्थित होत्या.