सावंतवाडीत शिवजन्मोत्सवाचा शानदार सोहळा 

भव्य रॅलीने वेधले सावंतवाडीकरांचे लक्ष

सावंतवाडी । प्रतिनिधी : स्वराज्य संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सावंतवाडी शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

या रॅलीमध्ये भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष लखमराजे भोसले, विशाल परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, अजय गोंदावळे, प्रतीक बांदेकर, तसेच नगरसेविका सौ. सुनीता पेडणेकर, सौ. दुलारी रांगणेकर, सौ. दिपाली भालेकर, सौ. सुकन्या टोपले उपस्थित होते. याशिवाय भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, दिलीप भालेकर आणि स्वराज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना युवराज लखमराजे भोंसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेले हजारो-लाखो शिवभक्त हीच महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे. या रॅलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तरुणांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद. स्वराज्य संघटनेने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या रॅलीने संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.