न्यु हनुमान दिवटेवाडी आयोजित अंडर आर्म किकेट स्पर्धेत गेम चेंजरने पटकावला एन.एच.डी. चषक

न्यु हनुमान दिवटेवाडी मंडळाच्या वतीने आयपीएलच्या धर्तीवर खेळविण्यात आलेल्या प्रकाश झोतातील भव्य अंडर आर्म किकेट स्पर्धेत प्रथम विजेता गेम चेंजर संघाला व उपविजेता स्टार पँथर संघ यांना गौरविताना मान्यवर.
स्टार पँथर ठरला उपविजेता

राजापूर | प्रतिनिधी : शहरातील न्यु हनुमान दिवटेवाडी मंडळाच्या वतीने आयपीएलच्या धर्तीवर खेळविण्यात आलेल्या प्रकाश झोतातील भव्य अंडर आर्म किकेट स्पर्धेत अंतिम लढतीत स्टार पँथर संघाला नमवत गेम चेंजर राजापूर संघाने एन.एच.डी. चषकावर आपले नाव कोरले. तर स्टार पँथर संघ उपविजेता ठरला. या दोन्ही संघाना मान्यवरांच्या हस्ते एन.एच.डी. व रोख पारितोषीक देऊन गौरविण्यात आले.

न्यु हनुमान दिवटेवाडी आयोजित ५२ वा क्रिडा महोत्सव नुकताच संपन्न झाला. यावेळी आयपीएलच्या धर्तीवर प्रकाश झोतातील अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिवटेवाडी येथील गोठण मैदानावर ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेचा शुभारंभाला राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा व माजी आमदार एड. हुस्नबानू खलिफे, उपनगराध्यक्ष विनय गुरव, नगरसेवक एड.जमीर खलिफे, सुबोध पवार, सिध्दांत जाधव, जान्हवी वादक, अफरोज झारी, शबाना मुल्ला, जिल्हा बँकेचे क्षेत्रीय अधिकारी संजय बाकाळकर, उद्योजक संदेश करंगुटकर, आकाश पाटील, काँग्रेस शहरअध्यक्ष अजीम जैतापकर, निसार मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत आठ संघांना प्रवेश देण्यात आला होता. आयपीएल धर्तीवर साखळी पध्दतीने ही स्पर्धा खेळविण्यात आली. या स्पर्धेच्या अंतीम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गेम चेंजर संघाने स्टार पँथर संघाला सहा षटकात ४७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र गेम चेंजर संघाया भेदक गोलंदाजीमुळे ३८ धावांपर्यंत स्टार पँथर संघ मजल मारू शकला. अंतीम सामन्या सामनावीर चिन्मय घुगरे तर स्पर्धेतील मालीकावीर म्हणून प्रथमेश उर्प राजा सूद, उत्कृष्ट गोलंदाज पार्थ तिर्लोटकर, उत्कृष्ट फलंदाज जॉन्टी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संजय पवार यांना तर उगवता तारा म्हणून अस्मीत दुधवडकर याला गौरविण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाला नगरसेवक ऍड.जमीर खलिफे, सुबोध पवार, दिलीप अमरे, माजी नगरसेवक नरेंद्र कोंबेकर, संजय ओगले, काँग्रेस शहरअध्यक्ष अजीम जैतापकर, युवासेनो प्रज्योत खडपे, सुशांत मराठे, शैबाज खलिफे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला रोख रक्कम व मानाचा चषक देवून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेला आमदार किरण सामंत यांच्या सह विविध मान्यवरांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी न्यु हनुमान दिवटेवाडी मंडळाचे अध्यक्ष गिरीष वादक यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.