लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील साटवली येथील शिवप्रतिष्ठान साटवलीच्या वतीने आज गुरुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ३९ रक्तदात्यांनी
रक्तदान केले.
शिवजयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र साटवली या ठिकाणी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आदेश आंबोळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी साटवली सरपंच दत्ताराम सावंत हे देखील उपस्थित होते. या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. एकूण ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे डॉक्टर जयश्री राठोड, डॉक्टर सबा शेख, प्रभाकर मुळेकर, श्रीमती प्रणाली आयरे ,धनश्री पानवलकर, निनाद आडवीरकर, निलेश तेरवणकर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र साटवली चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस डी गोटमपाड, आरोग्य सहाय्यक एस.डी कारेकर, आरोग्य सहाय्यक डी.के. सावर सावरटकर, आरोग्य सहायिका एस.एस.म्हेत्रे, कनिष्ठ सहाय्यक डी.जी. जांगळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी माजी सरपंच महेश नारकर, ग्रामस्थ सादिक कोंडकरी, युसुफ काझी, ओमकार गांगण, सुनील शेलार,आमीर आंबोळकर, योगेश चाळके प्रशांत भालेकर, प्रसाद भालेकर, महेश नेमण, निलेश चव्हाण, आनंद शेरे, सचिन कस्तुर आदी उपस्थित होते.












