रत्नागिरी ः प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा पोलिस भरतीच्या सहाव्या दिवशी शुक्रवारी चालक पोलिस शिपाई पदासाठी 854 उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यातील 507 उमेदवार हजर होते. तर 347 उमेदवार पोलिस भरतीसाठी गैरहजर राहिले होते. त्याचप्रमाणे सातव्या दिवशी शनिवारी 690 उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यातील 309 उमेदवारच हजर होते. तर 381 उमेदवार गैरहजर होते.
शिपाई आणि चालक शिपाई पदाच्या 108 पदांसाठी ही भरती प्रकिया सुरु आहे. शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी 507 आणि शनिवार 21 फेब्रुवारी रोजी 309 उमेदवार या पोलिस भरतीसाठी हजर होते. त्यातील पात्र उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्यात आली. यावेळी पोलिस भरतीची मैदानी चाचणी प्रथम घेण्यात येत असून नंतर लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे. ही पोलिस भरती एमआयडीसी येथील क्रिडा संकुल येथे पार पडत असून त्यावर पोलिस प्रशासन करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे कोणताही अनूचित प्रकार या पोलिस भरती होणार नाही असा विश्वास पोलिस विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.












