कोल्हापुरात दुर्मिळ ‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ मासा जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

 

कोल्हापूर, दि. २५ फेब्रुवारी २०२६ : गुप्त माहितीनुसार वन विभागाच्या पथकाने कोल्हापूर येथील फुलेवाडी रिंग रोडवरील ‘फ्रेंडशिप फिश कंपनी’ या दुकानावर कारवाई करत अनुसूचित-१ मधील दुर्मिळ शॉर्टफिन डेव्हिल रे (Mobula kuhlii)(मोहूर) या माशाचा मृत अवस्थेतील नमुना जप्त केला. हा मासा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली.

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित असलेला हा मासा अत्यंत दुर्मिळ मानला जातो. त्यामुळे त्याची विक्री अथवा साठवणूक करणे कायद्याने गुन्हा आहे. वनरक्षक करवीर यांनी या प्रकरणी WL ०४/२०२६, दिनांक २५/०२/२०२६ असा गुन्हा नोंद केला आहे.

या प्रकरणात श्री. सुनिल विनोद सातपुते (रा. येडेमच्छींद्र, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई मा. उपवनसंरक्षक कोल्हापूर श्री. धैर्यशील पाटील व मा. सहाय्यक वनसंरक्षक (वनी/कॅम्पा) श्री. विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी करवीर श्री. नंदकुमार नलवडे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल श्री. सागर कोळी, वनरक्षक श्री. ओंकार भोसले, श्री. विकास घोलप, श्री. महादेव कुंभार, श्री. विदेश तांबारे, कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर तसेच मानद वन्यजीव रक्षक श्री. रमण कुलकर्णी हे करत आहेत.

वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अनुसूचित प्रजातींची खरेदी-विक्री किंवा साठवणूक केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल